वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 5. सर्व आरती संग्रह › 10. नद्यांच्या आरती

॥ श्री आरती गोदावरी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-090246 · अभंग क्र. ३

3.
॥ श्री आरती गोदावरी ३ ॥

श्री आरती गोदावरी । उगमस्थ ब्रह्मगिरी ।
कुशावर्त गंगाद्वारी । माता श्री त्र्यंबकेश्वरी ॥१॥ धृ॰
जय पतित पावनी । निवृत्ति नाथाचरणी ।
गौतम श्री जटाधारी । वरदात्री गोदावरी ॥२॥
जय अमृत वाहिनी । वरदा माता अंजनी ।
वंदन श्री रामभूमी । कुंभपात्री गोदावरी ॥३॥
जय जीवन दायिनी । गोवर्धन जनस्थानी ।
नाथसागरा पैठणी । जलदात्री गोदावरी ॥४॥
जय गंगाश्री दक्षिणी । अनुबन्ध पंचक्षेत्री ।
संगम श्री राजमुंद्री । सुखदात्री गोदावरी ॥५॥
तुल्या वसिष्ठा गौतमी । श्रीभारद्वाजी आत्रेयी ।
कौशिकी वृद्धगौतमी । धारासप्त गोदावरी ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग