केली सीताशुद्धि । मू
4.
केली सीताशुद्धि । मूळ रामायणा आधी ॥१॥
ऐसा प्रतापी गहन । सकळ भक्तांचे भूषण ॥२॥
जाऊनि पाताळा । केली देवीची अवकळा ॥३॥
रामलक्षुमण । नेले आणिले चोरुन ॥४॥
जोडुनिया कर । उभा सन्मुख समोर ॥५॥
तुका म्हणे जपे । वायुसुता जाती पापे ॥६॥
