तयाचे चरित्र तोचि वद
3.
तयाचे चरित्र तोचि वदवीत ।
वैकुंठ समर्थ नांदे घरी ॥१॥
प्रतिष्ठानालागी स्वये जनार्दन ।
राहिले कारण दोन मास ॥२॥
नित्यनेम ज्याचा करी प्रात:स्नान ।
विधियुक्त जाण् वेदमार्गे ॥३॥
निळा म्हणे जाता गोदेचिया स्नाना ।
नवल विंदाना देखियेले ॥४॥
