बाहूबळे तुवा काढिले
13.
बाहूबळे तुवा काढिले अमृत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥१॥
जननी माझी जेव्हा ज्याकडे बाहत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥२॥
देवा बैसवोनि शुद्ध ते वाढीत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥३॥
क्षीराचा सागर उपमन्यूशी देत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥४॥
घेवोनिया चक्र परिक्षिता रक्षीत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥५॥
कवटाळूनि धरिले ध्रुवासी वनांत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥६॥
विदुराच्या घरी कण्या सांभाळीत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥७॥
चिरंजीव करूनिया नगरी सुवर्ण देत । ठेवी बा तो हात शिरा-चरी ॥८॥
नामा म्हणे युद्धी रक्षियेला पार्थ । ठेवी बा तो हात शिरावरी ॥९॥
