एक नाम हरी, द्वैत ना
13.
एक नाम हरी, द्वैत नाम दुरी ।
तोचि कल्पवरी चिरंजीव ॥१॥
ऐसा ज्या भार, नावाचे नारायण ।
नाही त्या बंधन कळिकाळाचे ॥२॥
न लगे सायास, न पडे संकट ।
नामे सोपी वाट, वैकुंठाची ॥३॥
सांवता म्हणे नर, तो प्रत्यक्ष पावन ।
गाई रामकृष्ण सर्व काळ ॥४॥
