तिही त्रिभुवनी विस्त
14.
तिही त्रिभुवनी विस्तारिली कीर्ती । तो हा श्रीपती उभा विटे ॥१॥
अनाथाचा नाथ पतित पावन । हे आम्हा वचन सांपडले ॥२॥
नाम धारकाच्या लागेन चरणी । घेईन पायवणी पोटभरी ॥३॥
आनंदे निर्भर नाचेन महाद्वारी । संत अधिकारी तेथीचे जे ॥४॥
निर्मळा करी प्रेमाची आती । करोनी श्रीपति वोवाळित ॥५॥
