आवडे हे रूप गोजिरे स
15.
आवडे हे रूप गोजिरे सगुण । पाहाता लोचन सुखावले ॥१॥
आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे । जो मी तुज पाहे पांडुरंगा/वेळोवेळा ॥धृ॥
लांचावले मन लागलीसे गोडी । ते जीवे न सोडी ऐसे जाले ॥३॥
तुका म्हणे आम्ही मागावे लडिवाळी । पुरवावी आळी मायबापा ॥४॥
