वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 31. संत माणकोजी बोधले › 1. संत माणकोजी महाराज बोधले अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले संपूर्ण अभंग गाथा › 1. संत माणकोजी महाराज बोधले एकूण अभंग 110

आलासि कोठोनि जासिल क

🙏 31. संत माणकोजी बोधले · ABH-080981 · अभंग क्र. १३

13.
आलासि कोठोनि जासिल कोठे । होतास कवणे ठायी रे ॥
मातापिता बंधू सखी म्हणसी सेवटी नव्हे ती काही रे ।
ऐसिया प्रकारे भुलले जन पावन करित काही रे ॥
सदगुरुसारिखा मातापिता बंधू । भावे शरण त्यासी जाई रे ॥
आशा मनसा तृष्णा कल्पना सर्वही । घातल्या पाई रे ॥
ऐसा जाणि जे तो साध भूत विश्वर । मनुषे देह तेथे नाही रे ॥
बोधला म्हणे ऐसा शरण जाई । मग तरसिल संदेह नाही रे ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग