वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 32. संत शेख महंमद › 1. संत शेख महंमद अभंग गाथा › 1. संत शेख महंमद अभंग गाथा संपूर्ण › 5. गुरुमहात्म्यपर

गुरुमहात्म्यपर

🙏 32. संत शेख महंमद · ABH-081042 · अभंग क्र. १३

१३.
गुरुमहात्म्यपर

मरण मारून मरा । भाई हो मरण मारून मरा ।
सद्गुरुस्वामि सेउनि । आत्महित आधी करा ॥१॥
कष्टि होऊनि कुडि पडे बापुडि ।
जिव हा पुट करि वेरझारा ॥छ ॥
मरता कोण्ही न दिसे ।
जे सारा हाट गाडग्याचा फेरा ॥२॥
स्वप्निचि भावना । तैसे जीवीत्व जाणा ।
जना नको सो डंब अहंकारा ।
येम जेव्हा जीवा करिल यातना ।
तेव्हा काकुलति येसि गव्हारा ॥३॥
विजवट गहन । तैसे जन्म मरण ।
देहि या पाट जिवनि नितनोवरा ।
सदगुरु वचने मरण मारुनि उरा ।
सेख महमद विनिवितो योगेश्वरा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग