सुखसागरी वास झाला ।
14.
सुखसागरी वास झाला । उंच नीच काय त्याला ॥१॥
अहो आपण जैसे व्हावे । देवे तैसेंचि करावे ॥२॥
ऐसा नटनाट्य खेळ । स्थिर नाही एक वेळ ॥३॥
एका पासूनि अनेक झाले । त्यासी पाहिजे सांभाळिले ॥४॥
शून्य साक्षित्वे समजावे । वेद ओंकाराच्या नांवे ॥५॥
एके उंचपण केले । एक अभिमाने गेले ॥६॥
इतुके टाकूनि शांती धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥७॥
