देह मृत्याचे भातुके
13.
देह मृत्याचे भातुके । कळो आले कवतुके ॥१॥
काय मानियेले सार । हेचि वाटते आश्चर्य ॥२॥
नाना भोगांची संचिते । करुनि ठेविले आइते ॥३॥
तुका म्हणे कोडी । उगवू न शकती बापुडी ॥४॥