सार सार सार विठोबा न
14.
सार सार सार विठोबा नाम तुझे सार । म्हणोनि शूळपाणी जपताहे वारंवार ॥१॥
आदि मध्य अंती निजबीज ओंकार । धृव प्रल्हाद अंबऋषी मानिला निर्धार ॥२॥
भुक्तिमुक्तिसुखदायक साचार । पतीत अज्ञान जीव तरले अपार ॥३॥
दिवसे दिवस व्यर्थ जात संसार । बापरखुमादेविवर विठ्ठलाचा आधार ॥४॥
