पंढरिये चोख रुपडे अश
13.
पंढरिये चोख रुपडे अशेख । भीमातीरी देख पुण्यभूमी ॥१॥
आदि पीठ देव ब्रह्म हे स्वंयमेव । पुंडलिक भाव प्रगटला ॥२॥
जन हे कोल्हाळ विठ्ठल तारक गोपाळ । कीर्तनी कळिकाऴ दूरी ठाये ॥३॥
नाम हे विठ्ठल न लगे पै मोल । नित्यता सकळ पांडुरंग ॥४॥
त्रिविध ताप पाप हे जिंतिल अमुप । मुरतील संकल्प एक्या नामे ॥५॥
निवृत्ति म्हणे धन्य कीर्तन जो करी । सर्वत्र चराचरी बोलियेले ॥६॥
अर्थ:
पुण्यभूमी पंढरी ज्या भीमातीरी वसली आहे तेथे सगुण रुपातील विठ्ठल रुप तुम्हाला पाहता येईल. पुंडलिकाच्या भक्तिभावामुळे पांडुरंग प्रगट झाला व त्यामुळे पंढरी हे आदि पीठ मानले जाते. इंद्रियाचा धनी असा तारक विठ्ठल जनातील कल्लोळ दुर सारतो व हे कीर्तनामुळे साध्य होते कीर्तनात कळीकाळालाही प्रवेश नसतो. जेथे श्री विठ्ठलाचा अखंड वास आहे तेथे कोणते ही मोल न देता नामसाधना होते. विठ्ठल नामामुळे त्रिविध ताप व अनेक पापे नष्ट होऊन संकल्प ही स्थिरावतात. निवृत्तिनाथ म्हणतात जो नामसंकीर्तन करतो तो धन्य आहे आशी सर्व चराचराची धारणा आहे.
