हरिहर ब्रह्मादिक । न
14.
हरिहर ब्रह्मादिक । नामे तरले तिन्ही लोक ॥1॥
ऐसा कथेचा महिमा । झाली बोलायाची सीमा ॥2॥
जपे तपे लाजविली । तीर्थे शरणागत आली ॥3॥
नामदेवा कीर्तनी । ध्वजा आल्या स्वर्गाहुनी ॥4॥
देव श्रुती देती ग्वाही । जनी ह्मणे सांगू कायी ॥5॥
