वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 14. ईतर प्रकरणे › 19. प्रेतयात्रा, स्मशान यात्रेचे, निर्याणपर अभंग

कोणे तुझा सांग केला

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073446 · अभंग क्र. १४

14.
कोणे तुझा सांग केला अंगीकार । निश्चिंती त्वा थोर मानियेली ॥१॥
कोणे ऐसा तूज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊ ॥२॥
तेव्हा तूज कोण घालील पाठीसी । घांसील भूमीसी वदन यम ॥३॥
का रे नागविसी आयुष्य खातो काळ । दिवसे दिवस बळ क्षीण होते ॥४॥
तुका म्हणे यासी सांगा कोणी तरी । विसरला हरि मायबाप ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग