सुखाची विश्रांती सुख
15.
सुखाची विश्रांती सुख समाधान । मनाचे उन्मन नाम गाता ॥१॥
ते हे नाम सोपे रामकृष्णहरि । प्रपंच बोहरी उच्चारिता ॥२॥
अंहभाव व्देष नुरे ती वासना । व्दैताची भावना दुरी ठाके ॥३॥
एका जनार्दनी नाम हे सोपारे । येणेचि पै सरे भवसिंधू ॥४॥
