फिरविले देऊळ जगामाजी
15.
फिरविले देऊळ जगामाजी ख्याती । नामदेवा हाती दूध प्याला ॥१॥
भरियेली हुंडी नरसी मेहेत्याची । धनाजी चाट्याची शेते पेरी ॥२॥
मीराबाईसाठी घेतो विष प्याला । दामाजीचा झाला पाडेवार ॥३॥
कबीराचे मागी विणू लागे शेले । मूल उठविले कुंभाराचे ॥४॥
आता तुम्ही दया करा पंढरीराया । तुका विनवी पाया वेळोवेळा ॥५॥
