वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 3. श्रीकृष्ण प्रगटला - अभंग १३ ते १६

एक धांवुनी सांगिती ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090410 · अभंग क्र. १४

14.
एक धांवुनी सांगिती । अहो नंदराया म्हणती । पुत्रसुख प्राप्ति । मुख पहा चला ॥१॥ सर्वें घेऊनि ब्राह्माण । पहावया पुत्रवदन । धावूंनियां सर्वजण । पहावया येती ॥२॥ बाळ सुंदर राजीवनयन । सुहास्यवदन घनः श्यामवर्ण । पाहूनिया धाले मन । सकळिकांचे तटस्थ ॥३॥ पाहूनि परब्रह्मा सांवळा । वेधले मान तमालनीळा । एका जनार्दनी पाहता डोळा । वेधे वेधिले सकळ ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग