काही नेणोनिया आण । ए
13.
काही नेणोनिया आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥१॥
पुढति पुढति मन । एकला विठ्ठलुचि जाण ॥२॥
हेचि गुरुगम्याची खूण । एक विठ्ठलुचि जाण ॥३॥
बुझसि तरि तूंचि निर्वाण । एकला विठ्ठलुचि जाण ॥४॥
हेचि भक्ति हेचि ज्ञान । एकला विठ्ठलुचि जाण ॥५॥
बापरखुमादेविवरा विठ्ठलाची आण । एकला विठ्ठलुचि जाण ॥६॥
