समाधी
१३.
समाधी
११०.
स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचे गुज होते कांहीं ॥१॥
करा हरीभजन तराल भवसागर । उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥
कृपा नारायणें केली मजवरी । तुम्हालागीं हरी विसंबेना ॥३॥
सेना सांगूनियां जातो वैकुंठासी । तिथि ते द्वादशी श्रावणमास ॥४॥
१११.
माझे झाले स्वहित । तुम्हा सांगतो निश्चित ॥१॥
करा हरीचे चिंतन । गावे उत्तम हे गुण ॥२॥
श्रावण वद्य द्वादशी । सेना समाप्त त्या दिवशी ॥ ३ ॥
