वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 3. श्रीकृष्ण प्रगटला - अभंग १३ ते १६

श्रीकृष्ण(जन्म) प्रग

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086478 · अभंग क्र. १३

13.
श्रीकृष्ण(जन्म) प्रगटला - अभंग १३ ते १६

गोकुळी आनंद जाहला । रामकृष्ण घरा आला । नंदाच्या दैवाला । दैव आले अकस्मात ॥१॥ श्रावण वद्य अष्टमीसीं । रोहिणी नक्षत्र ते दिवशी । बुधवार परियेसी । कृष्णमूर्ति प्रगटलीं ॥२॥ आनंद ब समाये त्रिभुवनी । धांवताती त्या गौळणी । वाण भरुनी नंदराणी । सदनाप्रती ॥३॥ एका जनार्दनी अकळ । न कळे ज्याचे लाघव सकळ तया म्हणती बाळ जो म्हणती बाळ । हालविती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग