॥ अभंग १३ ॥
13.
॥ अभंग १३ ॥
केशवाचे भेटी लागले पिसे ।
विसरले कैसे देहभान ॥ १ ॥
झाली झडपणी झाली झडपणी ।
संचरले मनी आधी रूप ॥ २ ॥
न लिंपेची कर्मीं न लिंपेची धर्मी ।
न लिंपे गुणधर्मी पुण्यपापा ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार सहज जीवन्मुक्त ।
सुखरूप अद्वैत नामदेव ॥ ४ ॥
