करितसे धांवणे आपुले
14.
करितसे धांवणे आपुले म्हणविता । वाहे थोर चिंता अनाथांची ॥१॥
पतित पावन साजे ब्रीदावळी । पाप ताप जाळी दैन्य त्यांचे ॥२॥
आपुल्या अंगाची करोनी साउली । राखे जैसी माऊली बाळालागी ॥३॥
चोखा म्हणे कृपाळु दीनाचे माहेर । जेणे धरियेले कर कटेवरी ॥४॥
