त्रिंबकमाहात्म्य.
१४.
त्रिंबकमाहात्म्य.
११२.
पुण्यभूमी गंगातीरी । धरी अवतार त्रिपुरारी ।
नाम त्रिंबक निर्धारी । मागें ब्रह्मगिरी शोभत ॥१॥
पार्वतीसी सांगे कैलासराणा । येथे नांदेल निवृत्ति निधान ।
त्याचेनि ठाव हा पुण्यपावन । जीवा उद्धरण म्हणता निवृत्ती ॥२॥
जुनाट जुगादीचे गुप्त ठेविले । तेचि निवृत्ति नाथा दिधले ।
ज्ञानदेवे प्रगट केलें । जगा दाविले निधान ॥३॥
या भूमिकेचें वर्णन । करू न शके चतुरानन ।
कैलासाहून पुण्यपावन । तुजला पूर्ण सांगितले ॥४॥
तो हा निवृत्तिनाथ निर्धारी । स्मरतां तरती नरनारी ।
सेना म्हणे श्रीशंकरी ॥ ऐसे निर्धारी सांगितले ॥५॥
११३.
शिवाचा अवतार । स्वामी निवृत्ति दातार ॥१॥
तया माझा नमस्कार । वारंवार निरंतर ॥२॥
सव्य नांदे कैलासराणा । मागें गंगा ओघ जाणा ॥३॥
सेना घाली लोटांगण । वंदि निवृत्तिचे चरण ॥४॥
११४.
निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरेची ॥१॥
जप करिता त्रिअक्षरी । मुक्ती लोळे चरणावरी ॥२॥
ध्यान धरिता निवृत्ती । आनंदमय राहे वृत्ती ॥३॥
सेना म्हणे चित्तीं धरा । स्मरता चुके येरझार ॥४॥
११५.
सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी ॥१॥
धन्य धन्य त्रिंबक राजा । तया नमस्कार माझा ॥२॥
जटी गंगा वाहे । तो हा त्रिगुणात्मक पाहे ॥३॥
भोंवता वेढा ब्रह्मगिरी । मध्ये शोभे त्रिपुरारी ॥४॥
सेना घाली लोटांगण । उभाहर के जोडुन ॥५॥
११६.
धन्य धन्य निवृत्तिराया । शरण आले तुझियां पाया ॥१॥
नको पाहू दुसरे आतां । गुण दोषाची वार्ता ॥२॥
नाही माझा अधिकार । यातीहीन मी पामर ॥३॥
अपराधाचा केलों । सेना म्हणे काय बोलों ॥४॥
