वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › २. बाळक्रीडा स्तुती

रुणझुण पायी वाजताती

🙏 4. संत नामदेव · ABH-083485 · अभंग क्र. १४

14.
रुणझुण पायी वाजताती वाळे । दावी ती पाउले दयानिधी ॥१॥
जनक्र याचे घरी चाळूनिया गेले । दावी ती पा-उले दयानिधी ॥२॥
गजा धरिले नक्रे तेव्हा जे धांवले । दावी ती पाउले दयानिधी ॥३॥
वस्त्रहरणी ज्याते द्रौपदीने चिंतिले । दावी ती पाउले दयानिधी ॥४॥
देखोनिया ज्याते कौरव भ्याले । दावी ती पाउले दयानिधी ॥५॥
धर्म आणि भीष्म विदुरादिक धाले । दावी ती पाउले दयानिधी ॥६॥
स्वयंवराशी जाता शीळे उद्धरिले । दावी ती पाउले दयानिधी ॥७॥
नामा म्हणे ज्याते बळीने पूजिले । दावी ती पाउले दयानिधी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग