नाही प्रेमभाव न कळे
13.
नाही प्रेमभाव न कळे मान्यता । सलगी बोलता सुख वाटे ॥१॥
अखंड नामावळी गाईन वेळोवेळी । नित्य ती दिवाळी आम्हा घरी ॥२॥
संत समागम वैष्णवांचा हाट । पंढरीये पेठ दुमदुमली ॥३॥
बंका म्हणे सुख तयाचे संगती । बैसेन पंगती हरिदासा ॥४॥