देखोनिया त्याचा अंतर
1320.
देखोनिया त्याचा अंतर्भाव ।
वोळला देव कृपासिंधु ॥१॥
येऊनि जवळी ह्रदयी धरी ।
आणि मुखी भरी ब्रम्हारस ॥२॥
देऊनी विभाग आपला मान ।
करी वाढवून मान्य जगी ॥३॥
निळा म्हणे ठाकूनि आलेला वेळ ।
आवडी गोपाळ आलिंगी त्या ॥४॥
1320.
देखोनिया त्याचा अंतर्भाव ।
वोळला देव कृपासिंधु ॥१॥
येऊनि जवळी ह्रदयी धरी ।
आणि मुखी भरी ब्रम्हारस ॥२॥
देऊनी विभाग आपला मान ।
करी वाढवून मान्य जगी ॥३॥
निळा म्हणे ठाकूनि आलेला वेळ ।
आवडी गोपाळ आलिंगी त्या ॥४॥