देता काहीचि न घेती ।
1322.
देता काहीचि न घेती ।
संत उदासीन चित्ती ॥१॥
त्रैलोक्यींचा मानधन ।
नावडे तया देवाविण ॥२॥
नाही आस्था देहावरी ।
आशा तृष्णा कैची उरी ॥३॥
निळा म्हणे ते देवचि झाले ।
कल्पकल्पांती संचले ॥४॥
1322.
देता काहीचि न घेती ।
संत उदासीन चित्ती ॥१॥
त्रैलोक्यींचा मानधन ।
नावडे तया देवाविण ॥२॥
नाही आस्था देहावरी ।
आशा तृष्णा कैची उरी ॥३॥
निळा म्हणे ते देवचि झाले ।
कल्पकल्पांती संचले ॥४॥