वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

येणे पागे पायापाशी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078967 · अभंग क्र. १३२९

1329.
येणे पागे पायापाशी । निश्चयेसी राहेन ॥१॥
सांगितली करीन सेवा । सकळ देवा दास्यत्व ॥धृपद॥
बंधनाची तुटली बेडी । हे चि जोडी मग आम्हा ॥२॥
तुका म्हणे नव्हे क्षण । पायाविण वेगळा ॥३॥

अर्थ :
देवा मी तुमचा सेवक आहे आणि निश्चयाने तुमच्या पाया जवळच राहणार आहे. देवा मी तुमचे सर्व प्रकारचे दास्यत्व पत्करले आहे. तेव्हा तुम्ही मला जी सेवा सांगायला ती सेवा मी करेन. देवा मी भवसागराची बंधने तोडली आणि तुझ्या पायाची प्राप्ती झाली तर हाच आमच्यासाठी मोठा लाभ असणार आहे. तुकाराम महाराज म्हणतात देवा तुमच्या पायापासून मी एक क्षण देखील वेगळा राहणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग