निजानंद भुसावला ।
1341.
निजानंद भुसावला ।
विठ्ठल झाला रुपाकृती ॥१॥
तेणे लाचविली मानसे ।
लाविले पिसे संतजना ॥२॥
नित्य त्यातेचि अवलोकिती ।
आणि वानिती गुण वाचे ॥३॥
निळा म्हणे नाचती रंगी ।
करिती जगी उत्साह ॥४॥
1341.
निजानंद भुसावला ।
विठ्ठल झाला रुपाकृती ॥१॥
तेणे लाचविली मानसे ।
लाविले पिसे संतजना ॥२॥
नित्य त्यातेचि अवलोकिती ।
आणि वानिती गुण वाचे ॥३॥
निळा म्हणे नाचती रंगी ।
करिती जगी उत्साह ॥४॥