वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

कोण पुण्य कोण गाठी ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-078872 · अभंग क्र. १३१८

1318.
कोण पुण्य कोण गाठी । ज्यासी ऐसीयांची भेटी ॥१॥
जीही हरी धरिला मनी । दिले संसारासी पाणी ॥धृपद॥
कोण हा भाग्याचा । ऐसियाची बोले वाचा ॥२॥
तुका म्हणे त्याचे भेटी । होय संसाराची तुटी ॥३॥

अर्थ :
असे कोणते पुण्य कोणाच्या पदरी आहे की ज्याला ज्ञानी भक्तांची भेट घडेल. की, ज्या हरीभक्तांनी संसारावर पाणी सोडले आणि हरीला आपल्या मनात धारण केले. असा कोण भाग्यवान आहे की त्या भाग्यवानाबरोबर ते हरीभक्त परमार्थाविषयी बोलण्यास तयार होतील. तुकाराम महाराज म्हणतात, “अशा ज्ञानी भक्तांची भेट होणे म्हणजे पूर्व पुण्यानेच हे होते आणि त्यांची भेट झाली की संसारबंधन तुटते.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग