नेणती ते आपपर ।
1342.
नेणती ते आपपर ।
विश्वी झाले विश्वंभर ॥१॥
नाही देहाची भावना ।
करिता नामसंकीर्तना ॥२॥
हरीच्या नामामृते धाले ।
गिळुनी ब्रम्हांडा राहिले ॥३॥
निळा म्हणे अवघ्याचि परी ।
झाले व्यापक चराचरी ॥४॥
1342.
नेणती ते आपपर ।
विश्वी झाले विश्वंभर ॥१॥
नाही देहाची भावना ।
करिता नामसंकीर्तना ॥२॥
हरीच्या नामामृते धाले ।
गिळुनी ब्रम्हांडा राहिले ॥३॥
निळा म्हणे अवघ्याचि परी ।
झाले व्यापक चराचरी ॥४॥