धरिती ज्या हाती संत
1330.
धरिती ज्या हाती संत कृपावंत ।
पाळी पंढरीनाथ लळा त्याचा ॥१॥
न विसंबे त्या घडी पळ युग मानी ।
दिसो नेदी जनी किविलवाणे ॥२॥
पाजी प्रेमपेहे वाह तया अंकी ।
म्हणे हे लाडकी तान्ही माझी ॥३॥
निळा म्हणे दावी स्वहिताचा पंथ ।
नेदी त्या आघात येऊ आड ॥४॥
