वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 172. राजाई चा निश्चय

नामदेवा घरी पाहुणे म

🙏 4. संत नामदेव · ABH-082780 · अभंग क्र. १३१९

1319.
नामदेवा घरी पाहुणे मेहुणे आले दोघेजण पंढरिसी ॥१॥
राजाईने बंधु देखुनि दृष्टिसी उल्हास मानसी थोर जाला ॥२॥
कडकडूनि भेटि लोभाची आवडी | टाकली घोंगडी बसावया ॥३॥
भ्रतार लागले विठोबाचे ध्यानी I संसाराची मनी आस्था नाही ॥४॥
नाचतो निर्लज्ज होऊनि निःशंक I सांडिला लौकिक देहभाव ॥५॥
ऐसे जब सांगे राजाई बंधुसी | तंव आले घरासी नामदेव ॥६॥
तयासी सोयरे अभ्युत्थान देती | न भेटे तयासी विष्णुदास ॥७॥
देखुनी कांतेसी क्रोध आला फार असोनि संसार नाही आम्हा ॥८॥
‘अगडधूत येती घेऊनि टाळविणा | लागे त्यांचे चरणा वेळोवेळा ॥९॥
जन्मामध्ये आले माझे सहोदर | न बोले उत्तर त्यांसी कांही ॥१०॥
भोंदु घरी येती हरिनामे गर्जती | धुवुनि त्यांचे पिती पायावणी ॥ | ११ ॥
माझे सर्व बंधु घरा आले बाई | रामराम तोहि न घे त्यांचा ॥१२॥
नामा म्हणे कांते राम हृदयांत | सांठवुनी तृप्त जालो आम्ही ॥१३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग