नामधारक हरीचे दास ।
1335.
नामधारक हरीचे दास ।
करिती नाश पापांचा ॥१॥
वसती त्यांच्या सहवासे ते ।
होताती सरते वैकुंठी ॥२॥
यमधर्म लागती पाया ।
लोकत्रयामाजी धन्य ॥३॥
निळा म्हणे हरिहर देव ।
करिती राणीव त्यांच्या घरी ॥४॥
1335.
नामधारक हरीचे दास ।
करिती नाश पापांचा ॥१॥
वसती त्यांच्या सहवासे ते ।
होताती सरते वैकुंठी ॥२॥
यमधर्म लागती पाया ।
लोकत्रयामाजी धन्य ॥३॥
निळा म्हणे हरिहर देव ।
करिती राणीव त्यांच्या घरी ॥४॥