न करितीचि काही वाणी
1331.
न करितीचि काही वाणी ।
देता पुरविती आयणी ॥१॥
म्हणती घ्या रे घ्या निज मुखे ।
अवघ्या एकचि धन सारिखे ॥२॥
नाही वांटिता भागले ।
सदा सर्वदा हरिखेले ॥३॥
निळा म्हणे पूर्णपणे ।
नेदिती पडो कोठे उणे ॥४॥
1331.
न करितीचि काही वाणी ।
देता पुरविती आयणी ॥१॥
म्हणती घ्या रे घ्या निज मुखे ।
अवघ्या एकचि धन सारिखे ॥२॥
नाही वांटिता भागले ।
सदा सर्वदा हरिखेले ॥३॥
निळा म्हणे पूर्णपणे ।
नेदिती पडो कोठे उणे ॥४॥