देव अंगे निराभास ।
1324.
देव अंगे निराभास ।
भक्त रुपस चांगला ॥१॥
म्हणोनिया ते आणिती रुपा ।
दर्पणी पहा पा जेवी नभ ॥२॥
नामे रुपे मंडित केला ।
शृंगारिला अळंकारे ॥३॥
निळा म्हणे भक्त जनक ।
देव बाळक या हेतु ॥४॥
1324.
देव अंगे निराभास ।
भक्त रुपस चांगला ॥१॥
म्हणोनिया ते आणिती रुपा ।
दर्पणी पहा पा जेवी नभ ॥२॥
नामे रुपे मंडित केला ।
शृंगारिला अळंकारे ॥३॥
निळा म्हणे भक्त जनक ।
देव बाळक या हेतु ॥४॥