तेचि संत तेचि संत ।
1316.
तेचि संत तेचि संत ।
ज्यांचा हेत विठठली ॥१॥
नेणती काही टाणेटोणे ।
नामस्मरणे वाचुनी ॥२॥
काया वाचा आणि मने ।
धाले चिंतने डुल्लती ॥३॥
निळा म्हणे विरक्त देही ।
आठवचि नाही विषयांचा ॥४॥
1316.
तेचि संत तेचि संत ।
ज्यांचा हेत विठठली ॥१॥
नेणती काही टाणेटोणे ।
नामस्मरणे वाचुनी ॥२॥
काया वाचा आणि मने ।
धाले चिंतने डुल्लती ॥३॥
निळा म्हणे विरक्त देही ।
आठवचि नाही विषयांचा ॥४॥