वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 172. राजाई चा निश्चय

वराईची गोणी कळली राज

🙏 4. संत नामदेव · ABH-082775 · अभंग क्र. १३२२

1322.
वराईची गोणी कळली राजाईसी नामा ब्राह्मणांसी बोलाविती ॥१॥
इतक्यामध्ये होन मडकेंभर काढिले | गोणी ते शिविली होती तैसी ॥२॥
द्विज मेळवुनि आला नामदेव वांटियेले सर्व द्रव्य त्याने ॥३॥
नामा म्हणे द्रव्य ज्याचे त्या दिधले | ऋण ते ठेविले नाही कांही ॥४॥
राजाई से होन राखावया गेली हाता राख आली कोळशांची ॥५॥
कोळसे देखोनि खोंचियली मनी | धन्य तुझी करणी पांडुरंगा ॥६॥
नामदेवापुढे सांगे वर्तमान | चोरून भ्या होन ठेविले होते ॥७॥
पाहाता होनांचे जाले हो कोळसे | नामा पाहता ते जाले सोने ॥८॥
वांटिले ब्राह्मणा ते होन तयाने | फेडियेले ऋण गोविंदाचे ॥९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग