वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 173. राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद

दोन्ही जोडुनि कर माथ

🙏 4. संत नामदेव · ABH-082858 · अभंग क्र. १३२४

1324.
दोन्ही जोडुनि कर माथा ठेवी चरणी | म्हणे परिसा विनवणी स्वामी माझी ॥१॥
मी तंव अज्ञान न कळे तुमचा महिमा अपराध क्षमा करा माझा ॥२॥
अंतरींची खूण कांही सांगा मज | जे तुम्ही हृदयी बीज धरूनि असा ॥३॥
जेणे सुखे तुमचे चित्त निरंतर | आनंदे निर्भर संदा असा ॥४॥
इच्छा तृष्णा देही मानवली कल्पना सदा समाधाना इंद्रियासी ॥५॥
मायबाप मज दिधले तुमच्या हाती | जन्मोनि सांगाति लावियेले ॥६॥
देव द्विज गुरु साक्ष हे करुनी | स्वामीचे चरणी जोडियले ॥७॥
तुमची चित्तवृत्ति उदास देखोनी | पडिले चितावनी काय करू ॥८॥
मग तुमचा स्वामी कृपेचा कोंवळा न धरत पातला अनाथबंधु ॥९॥
मग त्या विश्वंभरे कृपेच्या सागरें| पुसिली आदरे तुमची गोष्टी ॥१०॥
तंब मी दुराचारे निर्भत्सिले तुम्हा ऐकोनि मेघः श्यामा करुणा आली ॥ | ११ ॥
तब तो जगज्जीवन बोले अमृतवाणी | लोटोनिया गोणी दारवंटा ॥१२॥
म्हणोनि है द्रव्य तुम्ही सर्वहि वेचावे | आणिक मागावे लागेल ते ॥१३॥
सद्गदित कंठे सांगितले तुम्हा | परि न कळे मज महिमा वैवहीना ॥१४॥
लोभाचा बोरसु कोणिये जन्मींचा नकळे तुमचा ऋणानुबंधु ॥१५॥
पाहता श्रीमुख निवाले माझे चित्त | मग हे मनोरथ विसरले ॥१६॥
क्षण एक आनंद जाला माझे जिवी उपमा कवणे द्यावी तया सुखा ॥१७॥
आता ये संसारी मीच धन्य जगी जे तुम्हा अर्धागी विनटले ॥१८॥
परि मला एक वेळ घाला विठोबाचे पायी विनविते राजाई नामदेवा ॥१९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग