शिकवा हो रुक्माई आपु
1317.
शिकवा हो रुक्माई आपुलिया कांता | का आम्हा अनाथा कष्टवितो ॥१॥
जन्मोनिया आमुची पुरविली पाठी | मोडिली राहाटी संसाराची ॥२॥
आता आम्ही काय करणे माउलिये | बैसू सावलिये कवणाचिये ॥३॥
माझ्या भ्रतारासी लावियेला चाळा | क्षण जी वेगळा न करी त्यासी ॥४॥
आमुचा वेव्हार विध्वंसिला पाही | करुणा माझी कांही न ये त्यासी ॥५॥
सकळाचे मूळ आपणा आधीन केले येणे जाणे पांडुरंगे ॥६॥
आपुले परावे मोहो हा सांडिला | आंगोठा मोडिला उपाधीचा ॥७॥
उघडे घरदार लौकिक वेव्हार | धरिला निर्धार याचे नामी ॥८॥
रात्रंदिवस जपे गोविंद हृदयी | आमुची चिंता कांही नलगे त्यासी ॥९॥
तुमचे सन्निधाने जालो आम्ही दीन| न वाटे निर्वाण कैसे तुम्हा ॥१०॥
संसाराचि व्यथा नेणवे सर्वथा | होय ते उचिता करणे आम्हा ॥११॥
धरी निरंतर एकचि उत्तर परि हा तुम्ही विचार काय केला ॥१२॥
अनुभव अनुभवी जाणे तुम्ही समर्थपणे सदासुखी म्हणे नामी तुझ्या ॥१३॥
जन्मोनि अवधी तुमची पोसणी नेणो तुम्हांवांचोनि कोणी दुजे ॥१४॥
कायावाचामने तुमचिये पाई | विनविते राजाई जिवलगा ॥१५॥
