नाही भिन्नत्व उरले ।
1337.
नाही भिन्नत्व उरले ।
अवघ्या अंगे अवघे झाले ॥१॥
नेणती ते मानामान ।
जन तैसे तया वन ॥२॥
न लगे साधन त्या संपत्ती ।
देवचि झाले सर्वा भूती ॥३॥
निळा म्हणे एकाएकी ।
एकचि होऊनि ठेले लोकी ॥४॥
1337.
नाही भिन्नत्व उरले ।
अवघ्या अंगे अवघे झाले ॥१॥
नेणती ते मानामान ।
जन तैसे तया वन ॥२॥
न लगे साधन त्या संपत्ती ।
देवचि झाले सर्वा भूती ॥३॥
निळा म्हणे एकाएकी ।
एकचि होऊनि ठेले लोकी ॥४॥