वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 173. राजाईचे बंधू भेटण्यास आले असता राजाई नामदेवाशी झालेला संवाद

'नामा म्हणे स्त्रिये

🙏 4. संत नामदेव · ABH-082855 · अभंग क्र. १३२३

1323.
'नामा म्हणे स्त्रिये अनुचित केले | का माझ्या शिणविले विठोबाशी ॥१॥
निदेच्या उत्तरी निषेधिले मज वाटली त्या लाज मायबापा ॥२॥
मग तो माझा स्वामी जाला वेषधारी | तुजलागी सुंदरी पुढारला ॥३॥
रत्नजडित मुगुट सत्वर फेडोनि | आलासे वेढोनी शुभ्र शेला ॥४॥
तेणे भारे त्याचा धगधगिला मस्तक | म्हणोनि मज शोक वाटतसे ॥५॥
कस्तुरी मळवट सुरेख पुसोनि आलासे लावूनि विभुति भाळी ॥६॥
रूद्राक्षाचे मणि लेऊनि कर्णपुटी | कुंडले गोमटी लपविली ॥७॥
कौस्तुभ वैजयंति काढिली परती बांधलेंसे प्रीति शिवलिंग ॥८॥
देवूनि रखुमाईस वाटले उदास | हंसती उपहास केले त्याचे ॥९॥
रमा शरणागते आलिंगिली नाही | कैसी गोणी तिही कवळिली ॥१०॥
सर्वांगी साजिरी चंदनाची उटी भ्रंशली गोमटी श्रमु जाला ॥११॥
सोनसळापटा फेडोनि गोमटा | नेसला धुवटा बोटधारी ॥१२॥
इंद्रनीळ तनु रुळली असेल रजे | श्रीमुख रवितेजे कोमाइले ॥१३॥
धन्य तुझे नयन देखिले श्रीचरण |परी जीवे निंबलोण नाही केले ॥१४॥
द्रव्याचेनि लोभे भ्रांत जाले मन | हातीचे निधान हारपले ॥१५॥
आता आदिअंती पाहता केवळ | मूळ आणि फळ दुःखरूप ॥१६॥
जाणोनि निवृत्ति धरिली सज्जनी | सांडिले निर्वाणी वमन जैसे ॥१७॥
जाणसी ते करी आपुले तू हित | म्या ठेविले चित्त त्याचे पायी ॥१८॥
नामा म्हणे केशव न पाहे निर्वाण माझा अभिमान आहे त्यासी ॥१९॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग