वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 171. राजाई व नामदेव यांचा संवाद

सावध सावध राजाई हो स

🙏 4. संत नामदेव · ABH-082847 · अभंग क्र. १३१५

1315.
सावध सावध राजाई हो सुखे | नामयाने दुःख निरसिले ॥१॥
संसार सांते या येऊनि भाग्याचा छंद विठ्ठलाचा लागला यासी ॥२॥
याचे नाम ऐसे न दिसे त्रिभुवनी | नायको दुजे कर्णी नाम्या ऐसे ॥३॥
वैष्णवांचे गजर टाळघोष दिडी | उभयता ब्रह्मांडी घोष गेला ॥४॥
तयाच्या दर्शने कलिमाजी तारिली | भाग्ये विनटली विठ्ठलेंसी ॥५॥
राजाई म्हणे माते रखुमाई बुद्धिवंते | आमुच्या अदृष्टाते लिहिले कैसे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग