वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 167. गोणाई व नामदेव यांचा संवाद

गोणाई म्हणे नाम्या ज

🙏 4. संत नामदेव · ABH-082514 · अभंग क्र. १२९०

1290.
गोणाई म्हणे नाम्या जल्पसी भलते | तुज कोण्या दैवते वोढियेले ॥१॥
लाजिरवाणे तुवा केले रे हे जिणे | हांसती पिसुने देशोदशी ॥२॥
सांडी सांडी नाम्या तू हे देवपिसे | बळे घर कसे बुडवितोसी ॥३॥
नवमास उदराभीतरी वाहिला | माझ्या नेणत्या बाळा चाळविले ॥४॥
तुझे द्वारी बैसोनि उपवास करिन | नामा घेऊन जाईन गुणराशी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग