आई जे शिकवी तीते तुम
1312.
आई जे शिकवी तीते तुम्ही नाईका | नाही भय शंका लौकिकाची ॥१॥
लावोनि लंगोटी जालेती गोसावी | आमुची उठाठेवी कोण करी ॥२॥
ऐसी तुमची स्थिती विलग देखोनि पडिले चितवनी काय करू ॥३॥
धडचि कांटीये घातले हो कैसे बळेंचि आपणा पिसे लावियेले ॥४॥
सुखाचा संसार करोनि बारा वाटे | नांव केले मोठे जगामाजी ॥५॥
तोडियेला मोह सांडियेली माया | भुलविले तुमचिया चित्ता कोणे ॥६॥
कवर्णे पुष्प ऐसी जोडियेली जोडी | केली बिघडाबिघडी आम्ही तुम्हा ॥७॥
तुमचि हे गति लेकुरे नेणति | कोण चालविती घराचार ॥८॥
म्हणोनि माझे चित्त आपुलेनि उद्वेगे | कवणा जीवींचे सांगे सुखदुःख ॥९॥
सर्वस्वे सांडोनि धरिला तुम्ही देव | येणे पुसिला ठाव संसारींचा ॥१०॥
आमची कणव न वाटेचि कांही | विनविते राजाई नामदेवा ॥११॥
