ज्यांची वचने ऐके देव
1313.
ज्यांची वचने ऐके देव ।
पंढरिराव प्रीतीने ॥१॥
भेटविती भेटे तया ।
पसरुनिया निज कर ॥२॥
जे जे तया वाटे गोड ।
ते ते कोड पुरउनी ॥३॥
निळा म्हणे जवळी राहे ।
त्यांची पाहे निज वास ॥४॥
1313.
ज्यांची वचने ऐके देव ।
पंढरिराव प्रीतीने ॥१॥
भेटविती भेटे तया ।
पसरुनिया निज कर ॥२॥
जे जे तया वाटे गोड ।
ते ते कोड पुरउनी ॥३॥
निळा म्हणे जवळी राहे ।
त्यांची पाहे निज वास ॥४॥