जालो तव साचे । दास र
1302.
जालो तव साचे । दास राहवणे काचे ॥१॥
हे का मिळते उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥धृपद॥
सिंहाचे ते पिले । जाय घेऊनिया कोल्हे ॥२॥
तुका म्हणे नास । आम्हा म्हणविल्या दास ॥३॥
अर्थ :
देवा आम्ही तुझे खऱ्याअर्थाने दास झालो आहोत तरीही आम्हाला अज्ञानात राहावे लागते आहे. हे कृपावंता देवा आम्हाला असे ठेवणे योग्य आहे काय, तुम्हाला ते कळत नाही काय. बलाढ्य सिंहिणी ची पिल्ले जर कोल्ह्याने नेले तर सिंहाच्या दृष्टीने ते योग्य आहे काय ? तुकाराम महाराज म्हणतात आम्ही तुझे दास आहोत असे म्हणून घेतल्यावरही आमचा नाश होणे योग्य आहे काय ?
