काय त्यांचा महिमा वा
1294.
काय त्यांचा महिमा वाणू वारंवार ।
हरिभक्त थोर भूमंडळी ॥१॥
ज्याचिये भेटीचे आर्त ब्रम्हांदिका ।
पूज्य सकळ लोका विश्वा झाले ॥२॥
यमधर्म वास पाहे नित्य काळ ।
म्हणे धन्य वेळ भेटती ते ॥३॥
निळा म्हणे सर्व भाग्ये चोजविती ।
रिध्दिसिध्दि येती वोळंगणे ॥४॥
