वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २३. संतांचे वर्णन

गोड तुझी ब्रीदावळी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089628 · अभंग क्र. १३०३

1303.
गोड तुझी ब्रीदावळी ।
गोड गाता नित्यकाळी ।
गोड भक्त भावे बळी ।
तू वनमाळी त्यापाशी ॥१॥
गोड तुमची नामे गाती ।
गोड कीर्तनी उभे ठाकती ।
गोडा गोड तू श्रीपती ।
त्याची भुक्ति मुक्ति तूचि तू ॥२॥
गोड त्याचे स्वानुभव ।
तुमच्या पायी ठेविला जीव ।
गोड भक्ति दृढभाव ।
तुमच्या चरणी लिगटले ॥३॥
गोड त्याचे याती कुळ ।
गोड सत्कर्म ते सोज्वळ ।
गोड त्याचे बुध्दीबळ ।
तुज धरिले निश्चये ॥४॥
निळा म्हणे त्यांची मती ।
गोड कीर्तनी नवी स्फूर्ती ।
गोड तुमची सगुण मूर्ती ।
ह्रदयी त्याचे स्थिरावली ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग